जळगाव प्रतिनिधी | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रकक्षाच्या मागील बाजूस असलेल्या सी- २ कक्षात कोरोना रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरु झाले आहे. असून आज दिवसभरात २ रुग्ण दाखल झाले आहे.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रकक्षाच्या मागील बाजूस असलेल्या सी- २ कक्षात कोरोना रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरु झाले आहे. शनिवारी दि. १५ जानेवारी २ रुग्ण दाखल झाले आहे.
जिल्हयात दररोज कोरोना महामारीची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करणे सोयीचे व्हावे याकरिता सी-२ कक्षाची पाहणी करून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड आणि कमर्चाऱ्यांना विविध सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तीनवेळा सी- २ कक्ष धुवून, खाटांवर नवीन चादरी टाकून सी २ कक्ष सज्ज करण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावण्यात आला आहे.
दुपारी महाविद्यालय व रुग्णालयातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आल्यानंतर त्यांना सी- २ कक्षात दाखल करण्यात आले. सी- २ कक्षात ६४ खाटांची क्षमता आहे. याठिकाणी दुपारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पाहणी करून रुग्णांची विचारपूस करीत परिचारिका, डॉक्टरांना विविध सूचना दिल्यात. तसेच, वारंवार स्वच्छता ठेवण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले.