बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भाजप नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. बुलढाणा येथील भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले आहे.
भाजपा नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र सरकारने सुडभावनेने सायबर पोलीसांच्या मार्फत सायबर सेलची नोटीस पाठविली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहे व काही विशेषधिकार मिळालेले असताना त्याचा कोणताही विचार न करता महाविकास आघाडी सरकारने सुडभावनेने नोटीस पाठवुन पोलीस स्टेशनला बोलावले होते, त्याविरुद्ध भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले.
आघाडी सरकार सतत कायद्याचा भंग व पायमल्ली करीत आहे. पोलीस यंत्रणेचा गैरवापर करीत असुन विरोधी पक्षनेत्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु या दबावाला न घाबरता देवेंद्र फडणवीसानी सडेतोड उत्तर देत आहे व त्यांच्या पाठीमागे संपुर्ण भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील जनता खंबीरपणे उभे आहे. त्याच अनुषंगाने भाजपा नांदुरा तालुका व शहराचे वतीने आ.आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष भाजपा बुलढाणा जिल्हा यांच्या आदेशानुसार व भाजपा नेते चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनानुसार आज रविवार दि.13 मार्च 2022 रोजी सकाळी ठीक 11.30 वाजता तहसिल कार्यालय नांदुरा समोर महाविकास आघाडी सरकारने पाठविलेल्या बेकायदेशीर नोटिसची होळी करून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी शहरातील व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, मोर्चाचे पदाधिकारी,शक्ती केंद्र प्रमुख व सर्कल प्रमुख उपस्थित होते .