बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल घोषित करण्यात आला आहे. हा निकाला आज दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना पाहता येईल. विद्यार्थी mahresult.nic.in या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहू शकतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकाल जाहीर केला. महाराष्ट्राचा 12 वीचा निकाल हा 93.37 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला असून यात यंदाही मुलींने बाजी मारली आहे. यात एकूण 154 विषयासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यात एकूण 14 लाख 23 हजार 970 परीक्षार्थी होते तर त्यातील 13 लाख 29 हजार 684 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. कोकणने विभागानं आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.91 % तब्बल टक्के लागला आहे. तर मुंबई सर्वात तळाशी आहे. मुंबईचा निकाल 91.95 % लागला आहे. यात पुणे विभागाचा निकाल 94.44 टक्के निकाल लागला आहे. राज्यात नऊ विभागात तिसऱ्या क्रमांकावर पुणे विभागाचा निकाल लागला आहे. तर नागपूरात 92.12 टक्के, संभाजी नगर 94.08 टक्के, कोल्हापूर 94.24 टक्के, अमरावती 93 टक्के, नाशिक 94.71 टक्के, लातूर 92.36 निकाल लागला आहे. विज्ञान विभाग निकाल हा 97.82 टक्के, कला शाखा निकाल 85.88 टक्के, वाणिज्य विभाग निकाल 92.18 टक्के, तर व्यवसाय अभ्यासक्रम 87.25 टक्के इतका लागला आहे.

Protected Content