वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी गोंदियात तीन, तर भंडाऱ्यात एक अंडरपासची निर्मिती

गोदिंया-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वन्य जीवांचा अधिवास आणि भ्रमणक्षेत्र असलेल्या परिसरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात भरधाव वाहनाची वर्दळ असते. त्यामुळे अनेकदा वाहनांच्या धडकेत वन्यप्राण्याचे जीव जात असतात. याच पार्श्वभूमीवर वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग आणि भारतीय वन्य जीव संस्थेच्या पुढाकारातून जंगलात अंडरपासची निर्मिती करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हयात तीन आणि भंडारा जिल्याहत एक अंडरपासचे काम सुरू आहे.

भंडारा जिल्ह्यातील मुंडीपार ते साकोली दरम्यान मोहघाटा जंगलातील दोन किलोमीटरचा परिसर वन्यप्राण्यांच्या अधिवासाचा मार्ग आहे. याच महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल असल्यामुळे अनेक वन्यप्राण्यांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे या मार्गावर वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका होऊ नये, यासाठी 700 मीटरचा अंडरपास तयार करण्यात येत आहे. सध्या काम युद्धपातळीवर सुरू आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात चार अंडरपासची निर्मिती करण्यात आली आहे. चार पॅचमध्ये 750 मीटरचे तीन आणि 700 मीटरपैकी एक पाच मीटर उंचीचे अंडरपास असतील. शिवाय 26 कल्व्हर्ट असतील. प्रकल्पासाठी 540 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सिरपूर-नवाटोला (700 मीटर), मरमजॉब-डोंगरगाव (750 मीटर), बाम्हणी-डुग्गीपार (750 मीटर) आणि साकोली-मुंडीपार (750 मीटर) यादरम्यान अंडरपासची निर्मिती करण्यात आली आहे.

Protected Content