बीआरएसला भाजपची सुपारी : संजय राऊत यांची टिका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंढरपुरचा श्रीविठ्ठल महाराष्ट्रातील खोक्यांकडे आणि तेलंगणातील बोक्यांकडे पाहत असल्याचे सांगत खासदार संजय राऊत यांनी बीआरएसने भाजपची सुपारी घेतल्याची टिका केली आहे.

 

भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात प्रचंड गतीने एंट्री केल्याने राज्यातील पक्षांना एक समांतर पर्याय उभा राहिला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधीच हा पक्ष म्हणजे भाजपची बी टिम असल्याची टिका केली आहे. यावर आज खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत टिकास्त्र सोडले आहे.

 

आज संजय राऊत म्हणाले की, केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या हित पाहण्यासाठी इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी येथे येण्याची गरज नाही. तुमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर काम करत नाही, तसेच तुमच्या पक्षाकडे राष्ट्रीय धोरण नाही. तुमचा तेलंगणामधील पक्ष आहे. आंध्र प्रदेशमधील देखील नाही. पण तुम्ही आता महाराष्ट्रात घुसत आहेत. अर्थात भारतीय जनता पक्षाने तुम्हाला सुपारी दिली आहे. केसीआर यांच्या राज्यात आतापर्यंत ६५ सरपंचांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या राज्यात भ्रष्टाचार सर्वात मोठी प्रकरण आहेत. त्यांच्या मुलीवरती भ्रष्टाचाराचे प्रकरण आरोप आहेत. त्याची चौकशी करत आहे, या सर्वांचा परिणाम म्हणून ते भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मदत करण्यासाठी घुसले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

 

दरम्यान, त्यांनी केसी राव यांच्या पक्षाची बोके म्हणून संभावना केली आहे. पंढरपुरचा विठोबा हा महाराष्ट्रातील खोके आणि तेलंगणातील बोक्यांकडे पाहत असल्याचे ते खोचकपणे म्हणाले.

Protected Content