पाकिस्तानच्या बाबर आझमने रचला नवा विक्रम

babar ajhar

कराची वृत्तसंस्था । श्रीलंकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या पाकिस्तानच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत पाकच्या स्टार फलंदाज बाबर आझमने वेगवान शतकांचा नवा विक्रम रचला असून आझमने ७१ सामने खेळून ११ शतकं ठोकण्याचा पराक्रम केला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, श्रीलंकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या पाकिस्तानच्या एकदिसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बाबर आझमनं हा पराक्रम केला आहे. आझमनं या सामन्यात ११५ धावा फटकावल्या. एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचं अकरावं शतक आहे. अवघ्या ७१ डावांमध्ये त्यानं हा टप्पा गाठला आहे. विराट कोहलीला ११ शतकांचा टप्पा गाठण्यासाठी ८२ डाव खेळावे लागले होते. आझमनं ती कामगिरी विराटपेक्षा ११ सामने कमी खेळून केली आहे. श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं ७ बाद ३०५ धावा केल्या. त्यात आझमच्या ११५ धावांचा समावेश होता. अवघ्या १०५ चेंडूंत त्यानं या धावा केल्या. हा सामना पाकिस्ताननं ६७ धावांनी जिंकला. पाकिस्तान-श्रीलंकेमधील पहिला एकदिवसीय सामना रद्द झाला होता.

Protected Content