रवंजे शिवारात मका जळून खाक

एरंडोल प्रतिनिधी ।  एरंडोल तालुक्यातील रवंजे बू.येथील शेतातील मक्याला आग लागुन मका जळून खाक झाल्याची घटना घडली. तलाठी यांनी पंचनामा केला असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील  रवंजे बू येथील यशवंत राजधर कोळी यांच्या गट नं ४३/१ क्षेत्र ०४५ आर शेतात मका पेरलेला होता व नुकतीच त्याची कापणी करुन मक्याची कणसे त्याच ठिकाणी ठेवली होती. १७ एप्रिल रोजी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत  सुमारे ४० क्विंटल मका अंदाजे किंमत ४० हजार असलेला जळून खाक झाला.याप्रसंगी तलाठी डि.आर.पाटील,पोलीस पाटील शरयू चौधरी,यांनी,कोतवाल आधार नन्नवरे, बाळू कोळी, संजय चौधरी, गणेश चौधरी यांच्या समक्ष पंचनामा केला.

 

Protected Content