एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील फरकांडे शिवारामधील शेतात आग लागून सुमारे ६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शांतराम गोविंदा चव्हाण रा. फरकांडे ता. एरंडोल यांचे फरकांडे शिवारात गट नंबर ५७ मध्ये शेत आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १९ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील मकाला अचानक आग लागल्याने त्याचे सुमारे ६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात शांताराम चव्हाण यांच्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ युवराज कोळी करीत आहे.