Home Cities अमळनेर अमळनेर येथे घरफोडी; ४० हजारांचे दागिने लंपास

अमळनेर येथे घरफोडी; ४० हजारांचे दागिने लंपास

0
33

अमळनेर प्रतिनिधी । पिंपळे रोडवर येथील दिवाळीनिमित्ताने घरातील महिला माहेरी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांने घराचा कडी-कोंडा तोडून ४० हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना आज दि.१७ रोजी उघडकीस आली आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भूषण पाटील या दि.१५ नोव्हेंबरपासून दिवाळीसाठी माहेरी गेल्या असताना अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोंडा तोडून घरातील ४० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना आज दि.१७ रोजी महिला परत आल्यानतंर उघडकीस आली आहे. महिलेने पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कैलास शिंदे करीत आहेत.


Protected Content

Play sound