जामनेरात बंद घरफोडी; रोकडसह दागीने लांबविले

जामनेर प्रतिनिधी । शहरातील वर्धमान नगर परिसरात मध्यरात्री घरफोडी करून घरातून रोकड व सोन्याच्या दागिन्यांसह १ लाख १० हजार रूपयांची मुद्देमाल लांबविले आहे. जामनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हकीकत माहिती अशी की,  अभिजीत अरूणकुमार संचेती (वय-३२) रा. वर्धमान नगर, जामनेर हे कामाच्या निमित्ताने परिवारासह बाहेरगावी गेले होते. २५ मे सायंकाळी ५ ते २६ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घरफोडून घरातील ७५ हजार रूपयाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि २५ हजार रूपये किंमतीचे सोन्याच्या रिंगा असा एकुण २ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले आहे. अभिजित संचेती यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि किशोर पाटील करीत आहे. 

Protected Content