दोन दिवसात चार ठिकाणी घरफोडी ; यावल येथील घटना

यावल प्रतिनिधी । येथील फालकनगरात रात्री तर आयशानगरात भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, शहरात दोन दिवसात चौथी घरफोडीची घटना समोर आली आहे. या घटनांमुळे गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार, आज दि.१४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ते २ वाजेच्या दरम्यान यावल शहरातील विस्तारित वसाहतीमधील आयशानगर परिसरात राहणारे जाकीर खान शकील खान वय३५ वर्ष हे शहरातील आपल्या नातेवाईकाकडे खिरणीपुरा येथे लग्न कार्यक्रमास गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरात अनधिकृतपणे  प्रवेश करून घरातील कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवलेले ३० हजार रुपये कपाट तोडुन चोरून नेल्याची घटना उघडकीस आले.

घटनेचे वृत्त मिळताच यावलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल पठाण, पोलीस अमलदार संजय देवरे व भुषण चव्हाण यांनी या ठिकाणी भेट देवुन चोरीच्या घटनेची विस्तृत माहिती घेतली. यावेळी सपोनी पठाण यांनी अनोळखी व्यक्ती आपल्या परिसरात दिसुन आल्यास नागरीकांनी तात्काळ विचारणा करावी व त्वरीत पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

दरम्यान मागील दोन दिवसात विस्तारित वसाहतीमध्ये स्वामी समर्थनगर मध्ये एक ठिकाणी, फालक नगरमध्ये युसुफखान नसीर खान व  अशोक नेरकर यांच्या बंद घरात अशा दोन ठिकाणी व आयशानगर मध्ये एक ठिकाणी घरफोडीची चौथी घटना घडली असुन नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असुन पोलीसांनी वेळीच चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीक करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!