राज्य मार्गावरील अतिक्रमणधारकांना जागा मोकळी करण्याची नोटीस

यावल, प्रतिनिधी । येथील शहरातुन जाणाऱ्या बऱ्हाणपुर अंकलेश्वर या मार्गावरील शहरालगतच्या रस्त्यावर शासकीय जागेवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.यामुळे अनेक वेळा गंभीर अपघात देखील होत असतात. या व्यावसायिकांना महसूल प्रशासनाने जागा मोकळी करून देण्याबाबत नोटीस बजावली आहे. 

 

या संदर्भात फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी  १६ जून रोजी यावल शहरालगतच्या असलेल्या बऱ्हाणपुर ते अंकलेश्वर या राज्य मार्गा क्रमांक ४ किमी १८१ / ३३५ ते १८२ / ३३५ मध्ये रस्त्याच्या माध्यमासुन १५ मिटर अंतरावर अनधिकृतपणे सरकारी मालकीच्या जागेवर बेकायदेशीर ताबा घेवून  मार्गाच्या दोघ बाजूस कच्चे अथवा पक्के बांधकाम तयार केले आहे. या व्यावसायिकांना प्रांत कैलास कडलग यांनी  आठ दिवसाच्या आत आपआपल्या स्वखर्चाने केलेले अतिक्रमण काढुन घेण्याची नोटीस बजावली आहे. या व्यावसायिकांनी त्यांचे म्हणणे असल्यास, अथवा जागेच्या वापराबाबत काही कागदोपत्री पुरावा असल्यास, संबंधीत कार्यालयास त्वरित सादर करण्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.  अन्यथा जागा ताब्यात घेवून त्या खर्चाची नुकसान भरपाईसकट रक्कम वसुली करण्यात येणार आहे. 

दरम्यान या मार्गावरील अनधिकृत अतिक्रमण हे पुर्वी यावल तहसीलदार म्हणून व या वेळेस विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या कार्यकाळात सहा वर्षापुर्वी २०११ ते २०१४ वर्षीच्या या कार्यकाळात मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले होते.  यामुळे सदरच्या अतिक्रमणा विषयी प्रांत अधिकारी कैलास कडलग यांचा दांडगा अनुभव व निर्णय घेण्याची क्षमता यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न आता कायमचा मार्गी लागणार असल्याचे मत  व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content