धनगर समाजाचा रविवारी राज्यस्तरीय वधू वर मेळावा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४७ व्या जयंतीच्या निमित्ताने राज्यस्तरीय सकल धनगर समाज वधू वर परिचय मेळावा रविवार दि .३ डिसेंबर रोजी दुपारी ठीक १२ वाजता ,अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यलय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

विवाहेच्छूक उपवधू-वर, घटस्फोटीत, दिव्यांग वधू-वरांनी आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन सकल धनगर समाज,जळगावच्या वतीने चंद्रशेखर सोनवणे, शामकांत वर्डीकर ,भिकन पेंढारकर, योगीराज चिंचोरे, अविनाश सावळे, युवराज सावळे, सदाशिवराव ढेकळे, वसंत भालेराव, रमेश सुशिर, मधुकर ढेकळे, संजय ढेकळे, प्रल्हाद पवार, धोंडू वाघ,श्रावण खांडेकर, डॉ.पद्माकर सावळे, विश्वनाथ धनके, बन्सीलाल भागवत, हिरामण कंखरे, रवींद्र लाळगे,सुरेश पारखे, रामचंद्र भालेराव, अमृता सावळे, मंजू सूर्यवंशी, सुजाता सोनवणे, उषा झटकार, राजश्री बादशहा, लता पाचपोळ, हेमलता शिरोळे यांनी केले आहे.

Protected Content