लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा !

जळगाव प्रतिनिधी । कडक निर्बंधांच्या पार्श्‍वभूमिवर, ईदगाह मैदानावर साधेपणाने मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यात आले. याप्रसंगी महापौर, उपमहापौर यांच्यासह प्रशासनातील अधिकार्‍यांनी भेट देऊन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

आज बहुतांश मुस्लीम बांधवांनी घरीच नमाज पठण केले. तर ईदगाह मैदानावर मोजक्या बांधवांनीच उपासना करून कोरोनातून मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, महापौर जयश्री महाजन, उप महापौर कुलभूषण पाटील,जिल्हाधिकारी अभिजित राऊत,पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे,आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व एम आय डी सी चे पो नी प्रतापसिंग शिकारे यांनी ईदगाह मैदानाला भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी त्यांचे विधिवत स्वागत ईद गाह ट्रस्ट तर्फे गफ्फार मलिक,फारूक शेख,अश्फाक बागवान,ताहेर शेख, अनिस शाह,जाफर शेख, ऍड आमीर शेख यांनी केले.

याप्रसंगी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांनी ट्रस्ट चा आढावा सादर केला. कोरोना काळात कब्रस्थानच्या कार्याची माहिती, आकडेवारी, जन्म संख्या, मृत्युदर व जळगाव चा विस्तारा बाबत ची माहिती सचिव फारूक शेख यांनी मांडुन शासना कडे दोन्ही बाजूला कब्रस्थान ची मागणी केली. त्यास आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी होकार दिला तर जिल्हा अधिकारी यांनी प्रस्ताव सादर करण्याचे सांगून ट्रस्ट च्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी कोरोनात मृत्यू पावलेल्यांचा दफन विधी चोख पारपडल्या बाबत ट्रस्ट चे सह सहचिव अनिस शाह यांचे विशेष कौतुक करण्यात आले. प्रास्ताविक मुफ्ती हारून यांनी तर सूत्र संचलन व आभार फारूक शेख यांनी मानले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.