रायपूर येथील विवाहितेचा सोन्याच्या दागिन्यांसाठी छळ

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रायपूर येथील माहेर असलेल्या विवाहितेला सोन्याच्या दागिन्यांसाठी पती व सासरच्यांकडून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिना नरेंद्र एखंडे (वय-२८) रा. रायपूर ता. जि. जळगाव यांचा विवाह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील नरेंद्र केशव एखंडे यांच्याशी सन २०१७ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवस चांगले गेल्यानंतर लहान सहान कारणांवरून कुरापत काढून विवाहितेला मानसिक त्रास देण्याचे काम पतीकडून सुरू झाले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेरहून १ लाखांची मागणी केली. विवाहितेच्या आई वडिलांनी १ लाख रुपये व्याजाने काढून सासरच्या मंडळींना दिले. तरीदेखील पुन्हा त्यांनी शारीरिक व मानसिक छळ सुरू ठेवला. लग्नात दिलेले २० ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची मागणी केली असता विवाहितेने अशा छळाला कंटाळून माहेरी रायपूर येथे निघून आल्या.

दरम्यान याप्रकरणी रविवार २ जानेवारी रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. विवाहितेच्या तक्रारीवरून पती नरेंद्र केशव एखंडे, सासरे केशवलाल किशन एखंडे, सासू लताबाई केशवलाल एखंडे आणि दीर कैलास केशवलाल एखंडे सर्व रा. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सचिन पाटील करीत आहे.

 

Protected Content