ओएनजीसीच्या तीन कर्मचाऱ्यांचं अपहरण

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नैसर्गिक वायू आणि तेल कंपनी अर्थात ओएनजीसीच्या  तीन कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आल  आहे. आसाममधील शिवसागर जिल्ह्यातल्या लकुआ क्षेत्रातील रिंग साईटवरून कर्मचाऱ्यांचं अपहरण  उल्फाच्या सशस्त्र बंडखोरांनी केल्याची शक्यता आहे

 

. बुधवारी पहाटे ज्या गाडीतून कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आल ती सापडली असून, कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.

 

ओएनजीसीच्या ट्विटर हॅण्डलवर  ही माहिती देण्यात आली आहे. दोन कनिष्ठ सहायक अभियंते आणि कनिष्ठ तंत्रज्ञ अशा तीन कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे. रिंग साईटवर २१ एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी ही घटना घडल्याचं कंपनी व्यवस्थापनानं म्हटलं आहे.

 

अज्ञात बंडखोरांनी कर्मचाऱ्यांचं अपहरण करताना  ओएनजीसीच्या  गाडीचा वापर केला. ही गाडी आसाम-नागालँडच्या सीमेजवळ आढळून आली. सीमेजवळ असलेल्या निमनगढ जंगलाजवळ अपहरकर्त्यांनी ही गाडी सोडून दिली.  प्रशासनानं स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

 

स्थानिक प्रशासनाने घटनेची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर हालचालींना वेग आला असून, ओएनजीसी प्रशासन वरिष्ठ यंत्रणांच्या सातत्याने संपर्कात आहे,   अपहरणामागे बंदी घातलेल्या यूनाटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (स्वतंत्र) अर्थात उल्फा-आय या संघटनेचा हात असल्याचा अंदाज  आहे. कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून, संशयित परिसरांना वेढा टाकण्यात आला आहे.

Protected Content