जळगावात बालकुमार मराठी साहीत्य संमेलनाचे आयोजन (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 11 17 at 12.50.34 PM

जळगाव, प्रतिनिधी | सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे आयोजित एक दिवसीय बालकुमार मराठी साहीत्य संमेलन हे आज बहिणाबाई चौधरी सभागृहात सानेगुरुजी व्यासपीठावर घेण्यात येत आहे. या संमेलनाचे उद्घाटन युवा वक्ता गिरीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, माया दिलीप धुप्पड, उज्वला टाटीया उपस्थित होत्या.

संमेलनाचे उद्घाटक गिरीश पाटील यांनी बालसाहित्याबाबत आपला दृष्टिकोन स्पष्ट केला. यात त्यांनी मोठ्यांनी मुलांसाठी लिहिलेले साहित्य व मुलांनी लिहिलेले साहित्य या दोन प्रकाराबद्दल मत व्यक्त केले. तर संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश पाटील यांनी बालसाहित्य ही केवळ वाचनाची गोष्ट नसते तर ती बालकांच्या दृष्टीने अनुभवाची गोष्ट असते असे सांगितले. यासोबतच त्यांनी विविध उदाहरण देऊन आधुनिक युगात बालसाहित्याची गरज अधोरेखित केली. प्रास्ताविक सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी केले. संमेलनाचे सूत्रसंचालन वैदेही नाखरे यांनी केले. हे संमेलन चार सत्रात घेण्यात येत आहे. यात पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला असून सूर्योदय बालमित्र पुरस्कार सुभाषचंद्र वैष्णव व एकनाथ आव्हाड यांना देण्यात आला. सूर्योदय बालनाट्य पुरस्कार ज्योती कपिले यांच्या कोडी झाली नाटुकली या बालनाट्यलेख संग्रहास देण्यात आला तर सूर्योदय बालकाव्य पुरस्कार गणेश घुले यांच्या सुंदर माझी शाळा या बालकाव्य संग्रहास प्रदान करण्यात आला.

Protected Content