अवजड वाहनांची पुन्हा मुक्ताईनगरात एन्ट्री

मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अरुंद रस्ते व अवजड वाहनांची रहदारी यामुळे शहराचा श्वास कोंडला जात आहे. चौकांमध्ये होणा-या वाहतूक कोंडीमुळे नगरिकांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हायवे चौफुलीवरती दोन होमगार्ड यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुक्ताईनगर शहरात हायवे चौफुली वरून तसेच पुरणाड फाट्यावरून मोठमोठे ट्रक, कंटेनर शहरात प्रवेश करीत असतात व त्यामुळे चौफुली वरील खरेदी करणारे मुक्ताईनगर येथील नागरिक यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. कारण हे कंटेनर वाले भरधाव वेगाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक चालवीत असतात. प्रसंगी ते नशेत सुद्धा असतात. परंतु या कारणामुळे एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी जाऊ शकतो. तत्कालीन पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी यावरती उपाय म्हणून हायवे चौफुली वरती दोन होमगार्ड यांची कायमस्वरूपी नियुक्ती करून अवजड वाहतुकीवर नियंत्रण मिळवले होते. परंतु आता होमगार्डची तिथे नियुक्ती नसल्यामुळे कंटेनर सर्रासपणे भरधाव वेगात शहरातून ये-जा करीत असल्यामुळे मोटरसायकल धारकांना धोका निर्माण झालेला आहे. यावर उपाय म्हणून हायवे चौफुली वरती तसेच पुरणाड फाट्यावरती होमगार्ड किंवा पोलिसांची नियुक्ती करण्याची गरज असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. होमगार्ड यांची नियुक्ती मुक्ताई चौक वरती करण्यात आलेली होती त्यांची ड्युटी का बरं बंद करण्यात आली हे पण कारण अद्याप कोणालाही कळलेलं नाही.

Protected Content