रावेर प्रतिनिधी । अहिरवाडी येथे एका महिलेवर कोल्ह्याने हल्ला केला असून चार पाळीव बकऱ्या फस्त केला आहेत. यामुळे वन विभाग पुर्त हैराण झाले आहे. धुमाकुळ घालणारा कोल्हा प्राणी ट्रप कॅमेरामध्ये येत नसल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाच्या सूत्रा कडून समजलेली माहिती अशी की आहीरवाडी येथे घरात झोपलेली सगुणाबाई तायडे यांच्यावर कोल्हाने हमला केला यात महिलेच्या डोळ्याच्या खाली मोठी दुखापत झाली असून प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर रावेरात काल पुन्हा चार पाळीवर बक-या कोल्हाने फस्त केल्या असून हल्ला करण्याचे सत्र मागील अनेक दिवसां पासुन सुरु आहे.नागरीकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे.