राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत जळगाव तालुक्यातील २८ महिलांना धनादेश वाटप !

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते जळगाव तालुक्यातील २८ महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले आहेत. सदर अर्थ सहाय्य मधून शक्यतो मुलांच्या शैक्षणिक कामी खर्च करण्याचे नम्र आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते अजिंठा शासकिय विश्रामगृह येथे चेक वाटप प्रसंगी बोलत होते.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना १ महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी २० हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत जळगाव तालुक्यातील 28 महिलांना प्रत्येकी 20 हजार या प्रमाणे एकूण 5 लक्ष 60 हजाराचे चे प्रस्ताव मंजूर असून सदर धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तहसीलदार वैशाली हिंगे यांनी प्रास्ताविकात योजनेसंदर्भात सविस्तर माहिती विषद केली.

यांना मिळाला धनादेश
जळगाव तालुक्यातील सकीना देशमुख , शकिलाबी देशमुख, अनिता बिऱ्हाडे, कलाबाई देशमुख, सरला तायडे, मोहिनी पाटील, वर्षा पाटील, सविता माळी, रत्ना सोनवणे, कल्पना पाटील, अजय जाधव, संगीता पाटील, योगिता भालेराव , रूखमाबाई भिल, ज्योतिबाई भिल, मंगला कोळी, नीता सपकाळे, लताबाई गोपाळ, पुनम गाजरे, माधुरी अहिरे, सोनीबाई पाटील, मनीषा चव्हाण, अंजनाबाई लोखंडे, दुर्गाबाई चव्हाण, विजया धमाले, कमलबाई भारुडे, उषाबाई कोळी, रत्नाबाई जाधव या सर्व व्यक्तींना पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्याहस्ते धनादेश देण्यात आले.

Protected Content