पारोळा येथील साईबाबा मंदिरात अखंड हरिनाम संकीर्तन सप्तहास प्रारंभ

 

पारोळा, प्रतिनिधी | शहरातील श्री साईबाबा मंदिर संस्थान आणि ओम साईराम मित्र मंडळ यांच्यावतीने गुरुवारी ३० जानेवारीपासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास सुरवात झाली.  श्री साईबाबा मंदिर संस्थानतर्फे गेल्या १५ वर्षांपासून अखंडितपणे हरिनाम संकीर्तन सप्तहाचे मोठ्या उत्साहात भक्तिभावाने आयोजन करण्यात येत असून तीच परंपरा कायम राखत यंदाही मोठ्या उत्साहात आयोजन केले असून यंदाचे  १६ वे वर्ष आहे.

अखंड हरिनाम संकीर्तन सप्तहाचे दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ५ वाजता पांडुरंगाचा काकडा, ५ वाजता सामुदायिक हरिपाठ, रात्री ८ वाजता हरीकीर्तन आणि भजनी जागर हे कार्यक्रम होतील.  हभप चंद्रकांत महाराज (अर्थेकर),   हभप दिनकर महाराज (जळगाव), हभप पोपट महाराज (कसारखेडा),  हभप सुदर्शन महाराज (गोंदूर भोकर),  हभप प्रकाश महाराज शास्त्री (शिंदखेडा),  हभप प्रल्हाद महाराज (चिमठाणे),  हभप योगेश महाराज (वाघाडी)  यांचे अनुक्रमे कीर्तन होईल. अखंड हरिनाम सप्ताहाचा ६ फेब्रुवारीला काल्याच्या कीर्तनाने समारोप होईल.  अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. यात ५ फेब्रुवारी दुपारी २ ते ५ दरम्यान पालखी सोहळा, ६ फेब्रुवारी दहीहंडी सोहळा तसेच सप्ताहाच्या समारोप दिनी महाराप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात यांची असणार उपस्थिती 

आ.चिमणराव पाटील, माजी आ.डॉ. सतिष पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, दयाराम पाटील, नगरसेवक रोहन मोरे, मंगेश तांबे, बापू महाजन, प्रकाश महाजन, मनीष पाटील, नगरसेविका अलका महाजन, छाया पाटील, दिलीप महाराज, जगन्नाथ महाराज, संजय पाटील आदींची उपस्तिथी असणार आहे. या धार्मिक सोहळ्याला उपस्तिथीचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यशस्वीतेसाठी हभप सुरेशचंद्र महाराज,हभप जगन्नाथ महाराज, राजेश नागपुरे, सुनील बारी, गुरुदास महाजन, राहुल महाजन, शिवाजी मराठे, घनश्याम महाजन, मयूर महाजन, सागर महाजन, गणेश महाजन, योगेश महाजन, भैय्या पाटील, सोमनाथ पाटील, अमोल महाजन, किरण नागपुरे, हर्षल बारी, सुनील महाजन आदी परिश्रम घेत आहेत.

Protected Content