भुसावळात माजी नगरसेविकेच्या घरासमोर शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा

 

भुसावळ, प्रतिनिधी | येथील वार्ड क्रमांक २४ मधील नगरसेवक पदाच्या काल घेण्यात आलेल्या पोट निवडणुकीचा निकाल आज (दि.१०) जाहीर झाला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्गेश ठाकूर हे उमेदवार विजयी झाले. त्यांची विजयी मिरवणुक दुपारी १.३० च्या सुमारास माजी नगरसेविका सोनल महाजन यांच्या घरासमोर आली असता ठाकूर यांच्या काही कार्यकर्त्यांनी मोठ-मोठयाने आरडा-ओरड व घोषणाबाजी, शिवीगाळ करुन त्यांच्या घरात प्रवेश केला व गुलाल उधळुन दहशत माजवली. अशी तक्रार महाजन यांनी पो.स्टे.ला दिली आहे.

 

त्यांनी म्हटले आहे की, माझे घरात कोणीही पुरुष मंडळी हजर नसतांना मिरवणुकीतील मनोज धनराज चौधरी, रा.शिव कॉलनी, पवन अरविंद चौधरी, सॅक जिम संचालक, राहुल रविंद्र वाघ, जगदीश धोंडु वाघ, भुषण वराडे (पुर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सौ.सोनल महाजन यांच्यासह त्यांचे पती रमाकांत महाजन, नगरसेवक महेद्रसिंग ठाकुर, युवराज दगडु लोणारी, रेखा सुनिल सोनवणे व योगेश वायकोळे उपस्थित होते. पुढील तपास सपोनि सारिका खैरनार करीत आहे.

Protected Content