जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील ईलेक्ट्रॉनीक वस्तूंचे होलसेल डिस्ट्रीब्यटरचे गोडावून फोडून २७ हजार ५०० मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २७ जुलै रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कृषि उत्पन्न बाजार समितीजवळ निखील अशोक जैन (वय-३७) रा. प्रभात कॉलनी, जळगाव यांचे दोशी इंटरप्रायझेस नावाचे गोडावून आहे. २१ जुलै रोजीच्या मध्यरात्री गोडावूनच्या वरच्या मजल्यावरून खोलीची खिडकी तोडून आत प्रवेश करत लॅपटॉप, डिव्हीआर, शिक्का, मॉनीटर, सॅनडिस्क, कॅमऱ्याचे मेमरी कार्ड यांच्यासह २७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरी झाल्यानंतर निखिल जैन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार २७ जुलै रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.