हळदीच्या कार्यक्रमात जमावाचा प्राणघातक हल्ला; पोलीसांच्या वाहनावर दगडफेक

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आंतरजातीय विवाहाला विरोध करत जमावाने थेट हळदीच्या दिवशी मंडपात येऊन वधू-वरावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला तर पोलीसांनीच्या वाहनावर दगडफेक करून नुकसान केले. याप्रकरणी भडगाव पोलीसात जमावावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील देव्हारी येथे सोमवारी ६ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास वर-वधुचे लग्न होते. त्यानिमित्ताने हळदीचा कार्यक्रम सुरू होते. गावात राहणारे अनिल सोनवणे, सुखदेव उर्फ अप्पा देवाराम सोनवणे, समाधान सोनवणे, दिलीप गायकवाड आणि योगेश सोनवणे यांच्यासह अनोळखी वीस ते तीस महिला व पुरूष यांचा जमाव थेट हळदी मंडपात आला.  वधूला जातीबाबत विचारण्याच्या कारणावरून काही वेळेतच जमावाने हळद लागलेल्या वधू-वरावर हल्ला चढवला.

 

दरम्यान, हळदीचा कार्यक्रम सुरू असतांना अचानक झालेल्या हल्ल्यात वधुवर चॉपरने वार करून जखमी केले. तर मंडपातील साहित्यांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला असता वधुकडी जमावाने पोलीसांच्या वाहनासमोर आडवे होवून वाहनावर दगडफेक केली व वाहनाच्या काचा फोडल्या. फिर्यादीवरुन भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर तपास करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!