कथित हॅकर मनीष भंगाळेच्या विरोधात गुन्हा दाखल

बुलढाणा प्रतिनिधी । एकनाथराव खडसे यांच्यावर दाऊदच्या पत्नीशी संभाषण केल्याचा आरोप करणारा कथित हॅकर मनीष भंगाळे याच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीष भंगाळे याने एकनाथराव खडसे यांनी दाऊदच्या पत्नीशी मोबाईलवरून संभाषण केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. यानंतर त्याचा हा कांगावा असल्याचे सिध्द होऊन भंगाळेला अटक देखील करण्यात आली होती.

दरम्यान, एकनाथराव खडसे यांचे समर्थक माधव पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड या पोलीस स्थानकात मनीष भंगाळेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भंगाळे याने खडसेंची प्रतिमा मलीन करण्यासाठी खोटे आरोप केल्याची ही तक्रार आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.याबाबतचे वृत्त सरकारनामा या पोर्टलने दिले आहे.

jalgaon | jalgaon news | jalgaon news in marathi | jalgaon breaking news | breaking news of jalgaon | bhusawal | bhusawal news | amalner | amalner news | chalisgaon | chalisgaon news | pachora | pachora news | bhadgaon | bhadgaon news | raver | raver news | muktainagar | muktainagar news | jamner | jamner news | parola | parola news | chopda | chopda news | dhaarangaon | dharangaon news | yawal | yawal news | erandol | erandol news |

 

Protected Content