महाड । महाड शहरातील पाच मजली इमारात कोसळल्याची दुर्घटना आज सायंकाळी घडली असून यात अनेक कुटुंबातील लोक हे ढिगार्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.
कोकणातील महाडमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, शहरातील पाच मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीमध्ये तब्बल ४७ कुटुंबांचे वास्तव्य होते. यातील बहुतांश लोक या ढिगार्याखाली अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे हा अतिशय भीषण प्रकार असून यात मोठी प्राणहानी होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.