भुसावळ प्रतिनिधी । बीएसएनएलच्या राष्ट्रव्यापी संपात भुसावळ येथील बीएसएनएलचे कर्मचारीदेखील सहभागी झाले आहेत.
आज दि १८ फेब्रुवारी २०१९ पासून ३ दिवस देशभरातील सर्व प्रमुख कामगार संघटनासह भारत संचार निगम ली. मधील कर्मचार्यांच्या सर्व संघटनांनी संप पुकारला आहे. यामध्ये भुसावळ विभागात सर्व संघटनेचे १०० टक्के कर्मचारी संपात सहभागी झालेआहेत. येथील बीएसएनल एम्पलॉइज यूनियन चे जिला उपाध्यक्ष कॉम्रेड सुरेश पाटील, भुसावळ शाखेचे अध्यक्ष विजय सरोदे, सेक्रेटरी कडू चौधरी, लीना पाटील, हरीश इंगळे, संजय पाटील तसेच एनएफटीई युनियनचेे (एलसीएम मेंबर ) मोहन भोगे, सचिव गंभीर पाटील, रामा पाटील, भागवत पाटील रवींद्र नारखेडे, एसएनइए असोसिएशनचे रिझवान शेख, के .जि .कदम, आर. पी. पाटील, अनुप पटेल तसेच पी. बी. चौधरी व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.