शहिद जवानांचे कर्ज तात्काळ माफ

मुंबई प्रतिनिधी । स्टेट बँक ऑफ इंडियाने २३ शहीद जवानांचे कर्ज तात्काळ माफ केले असून सर्व जवानांच्या विम्याची रक्कम तात्काळ अदा करण्याचे निर्देश दिले आहेत.

सीआरपीएफचे सर्व जवान हे स्टेट ऑफ इंडियाचे ग्राहक आहेत. त्यांचा पगार हा स्टेट बँकेच्या खात्यात जमा होतो. बँकेच्या विमा सुरक्षेच्या नियमानुसार संरक्षण दलातील जवानांना ३० लाख रुपयांचे विमा कवच असते. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना ही रक्कम तत्काळ दिली जाणार असल्याचे बँकेने जाहीर केले आहे. याशिवाय, हुतात्मा झालेल्या २३ जवानांनी स्टेट बँकेकडून घेतलेले कर्जदेखील तात्काळ माफ करण्यात आल्याचे बँकेने ट्विटरवरून जाहीर केले आहे.

Add Comment

Protected Content