साकेगाव ग्रामपंचायत उपसरंपचपदी सागर सोनवाल यांची बिनविरोध निवड

साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड मंगळवारी दुपारी २ वाजता करण्यात आली. उपसरंपचपदी सागर सोनवाल यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचे पहायला मिळाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता.

निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एल.पाटील यांनी काम पाहिले. उपसरपंच पदाची निवड झाल्यानंतर सागर सोनवाल यांची साकेगावातून ढोल ताशांच्या गाजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी साकेगाव गृप ग्रामपंचायतीचे सदस्य आनंद ठाकरे, अशोक कोळी, पॅनल प्रमुख माजी सरपंच अनिल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील, वाघुर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिलीपसिंह पाटील, राजेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, सुभाष कोळी, डॉ.दीपक राज पाटील विठ्ठल पाटील, गजानन कोळी, दिलीप पाटील, विलास ठोके, ग्रामपंचायत सदस्य धनराज भोई, राज सुपर शॉपचे संचालक आबा शेठ, प्रकाश कोलते, विनोद परदेशी, प्रकाश कुरकुरे, राहुल चौधरी, संतोष भोळे, दिगंबर फालक, वामन कचरे, निवृत्ती पाटील, पिंटू हडपे यांच्यासह गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

दरम्यान, या निवडीबद्दल सागर सोनवाल यांचे आमदार संजय सावकारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content