मसूद अजहरची सुटका करणारे मला देशद्रोही म्हणताय : सिद्धू

 

चंदीगड (वृत्तसंस्था) पुलवाम्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सिद्धू यांनी केलेल्या विधानानंतर पंजाब विधानसभेत आज अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया आणि सिद्धू यांच्यात वादविवाद झाले आहेत. सभागृहात मजीठिया यांनी सिद्धूला गद्दार असे संबोधले आहे, तर सिद्धू यांनी मजीठिया यांना डाकू म्हटले आहे. दरम्यान, पुलवामात दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या मसूद अजहरची 20 वर्षांपूर्वी कोणी सुटका केली? आज जे मला देशद्रोही म्हणत आहेत, त्या लोकांनीच अजहरची सुटका केली आणि त्याला पाकिस्तानला पाठवले. त्यानंतर इतकी वर्ष त्याला अटक करुन देशात आणण्यासाठी त्यांनी काय केले?, असा सवाल देखील काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी विचारला.

 

पंजाब विधानसभेत आज दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात अपशब्द वापरले. त्यानंतर मोठा गदारोळ झाल्याने पंजाब विधानसभेच्या अर्थसंकल्पाचे भाषण थांबवण्यात आले. सिद्धूच्या विरोधात अकाली दल आणि भाजपा नेत्यांनी वॉक आऊट केले. बिक्रम सिंह मजीठिया यांनी नवज्योत सिंग सिद्धूचे पाकिस्तान दौऱ्यातील पाक आर्मी चिफ जनरल बावजांच्या गळाभेटीचे फोटो दाखवले. तसेच खलिस्तान समर्थक गोपाल चावला यांचे फोटो दाखवले. अमरिंदर सिंग पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करत असतानाच सिद्धू शांत राहण्याचे आवाहन करत आहे. सिद्धूला भारतापेक्षा इम्रान खान यांची मैत्री महत्त्वाची वाटते.

 

तर दुसरीकडे प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धू म्हणाले, ‘पुलवामा हल्ल्यामागे काही मोजकी माणसं आहेत. त्यांनी केलेल्या कृत्यांची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी, यावर मी ठाम आहे. परंतु, सामान्य माणसाला, निष्पाप महिलांना, लहानग्यांना मिळू नये, असे मला वाटते. कारण अशी कृती शिख गुरुंच्या आणि मानवतेच्याही विरोधातली आहे. 1999 मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरण घडले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी अजहरची सुटका केली होती. 20 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेचा संदर्भ देताना व भाजपवर टीका करताना सिद्धू म्हणाले, ‘भाजपवर टीका करताना सिद्धू म्हणाले, ‘पुलवामात दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या मसूद अजहरची 20 वर्षांपूर्वी कोणी सुटका केली? आज जे मला देशद्रोही म्हणत आहेत, त्या लोकांनीच अजहरची सुटका केली आणि त्याला पाकिस्तानला पाठवले. त्यानंतर इतकी वर्ष त्याला अटक करुन देशात आणण्यासाठी त्यांनी काय केले?, असा सवाल देखील सिद्धू यांनी विचारला.

Add Comment

Protected Content