सामाजिक समरसता मंच यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील सामाजिक समरसता मंच यांच्या वतीने 14 एप्रिल 2024 रविवार रोजी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पाणी वाटपाचा कार्यक्रम संध्याकाळी 7.00 वाजता करण्यात आला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक मोहन चौधरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पत्रकार अविनाश बाविस्कर आणि पत्रकार मोरे दादा यांचे हस्ते पानिवाटापाचे उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी समरसता मंचाचे तालुकाप्रमुख नाना लांबोळे, देवेंद्र अत्तरदे जिल्हा सहकार्यवाह, विभाग संयोजक नंदकिशोर जाधव, वनवासी कल्याण आश्रम प्रांत कार्यकर्ते किशोर चौधरी, विश्व हिंदू परिषदेचे, तसेच सामाजिक कार्यकर्ते, अन्य स्वयंसेवक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.

Protected Content