लाच भोवली : सहकार अधिकार्‍यासह सहाय्यक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खरेदी केलेल्या घराची दप्तरी नोंद  करून ताबा पावती देण्याच्या मोबादल्यात पाच हजाराची लाच मागणाऱ्या उप निंबध सहकार अधिकाऱ्यासह सहाय्यक सहकार अधिकारी यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी सिंधी कॉलनी भागात घर खरेदी केले आहे. खरेदी केलेल्या घराची दप्तरी नोंद करून त्याबाबतची ताबा पावती देण्याच्या मोबादल्यात उप निंबध सहकारी संस्थेत काम करणारे सहकार अधिकारी विजय सुरेशचंद्र गोसावी (वय-५४) रा. आशा बाबा नगर आणि सहाय्यक सहकार अधिकारी चेतन सुधारक राणे (वय-४८) रा. गणेश कॉलनी जळगाव यांनी ५ हजाराची मागणी पंचा समक्ष केली आहे. लाचलुचपत विभागाने दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

 

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक संजो बच्छाव, पो.नि. एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील,  सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, रविंद्र घुगे, महिला पोहेकॉ. शैला धनगर, पोना मनोज जोशी, पोना जनार्धन चौधरी, सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पोकॉ महेश सोमवंशी, पोकॉ नासिर देशमुख, पोकॉ ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.

Protected Content