पत्नीनं केलं असं काही… झोपेतून उठलेल्या पतीला बसला धक्का !

दीड वर्षाचा मुलगा झाला पोरका

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील किनोद येथे २४ वर्षीय विवाहितेने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी ३० डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अश्विनी विशाल चौधरी (२४, रा. किनोद, ता. जळगाव) असे या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील किनोद येथे अश्विनी चौधरी ही विवाहिता पती आणि दीड वर्षाचा मुलगा यांच्यासह वास्तव्याला होत्या.
पती विशाल हे जळगावात खाजगी क्षेत्रात काम करून उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, २९ डिसेंबर रात्री सर्व जणांनी सोबत जेवण केल्यानंतर चौधरी कुटुंबीय झोपले. शनिवारी ३० डिसेंबर रोजी मध्यरात्री विवाहितेने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे ३ वाजता पती विशाल चौधरी हे पाणी पिण्यासाठी उठले. त्यावेळी ही घटना समोर आली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. त्यांनी एकच आक्रोश केला.

विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content