भाजपाचे भुसावळ प्रांत कार्यालयासमोर आंदोलन

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील वरणगाव येथे पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र बनत चालली आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरणगाव नगरपरिषदेवर विविध आंदोलने करण्यात आली.  तरीदेखील पिण्याची पाण्याची समस्या सुटलेल्या नसल्यामुळे वरणगाव भाजपाच्या वतीने भुसावळ प्रांत कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.

वरणगाव ची लोकसंख्या जवळपास पन्नास हजाराच्या आसपास आहे, वरणगाव लगतच सात किलोमीटर अंतरावर हातनुर धरण आहे, तरीदेखील वरणगाव वासियांना दहा ते पंधरा दिवसातून पाणी मिळते ,म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरणगाव नगरपरिषदेवर अनेक आंदोलने केली, तरीही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे आज वरणगाव चे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ येथील प्रांत कार्यालयावर पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!