यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बामणोद येथील एका तरुणाने तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्म्हत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. देवेंद्र पंकज पाटील (वय-१९) रा. इंदिरानगर, बामणोद ता. यावल असे मयताचे नाव आहे.
देवेंद्र पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ३ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र पाटील या तरूणाने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, यात तापी नदीच्या पुलावरून उडी घेतल्या नंतर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो गंभीर जखमी झाला. यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात घेवुन जात असतांना उपचारापुर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनासमोर आली आहे. या संदर्भात मयताचा भाऊ भूषण पंकज पाटील यांनी फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गोकुळ तायडे हे पण नितीन करीत आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही.