अमळनेर प्रतिनिधी । गेल्या आठवड्यापासून अमळनेर तालुक्यातील कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १९ ते २१ मार्च असे तीन दिवस अमळनेर नगरपालिका हद्दीत निर्बंध लागू करण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सीमा अहिरे यांनी काढले आहे.
जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात आता कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला आहे. गेल्या आठवड्यापासून अमळनेर तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. काल १७ मार्च रोजी जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालात अमळनेर तालुक्यातून ९१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमळनेर नगरपालिका हद्दीत १९ मार्च ते २१ मार्च दरम्यान निर्बंध लागू करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी सीमा अहिरे यांनी असे आदेश आज सकाळी काढले.
नगरपालिका क्षेत्रात निर्बंध याप्रमाणे राहतील
* सर्व बाजारपेठ, आठवडी बाजार बंद राहतील.
* किराणा दुकाने इतर सर्व दुकाने बंद राहतील,
* किरकोळ भाजीपाला, फळ खरेदी विक्री केंद्र बंद राहतील.
* शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय बंद राहतील.
* सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतीक, धार्मीक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.
* शॉपींग मॉल्स, मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलुन, लिकर शॉप बंद राहतील.
* गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षणगृहे, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.
* पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीचे ठिकाणे बंद राहतील.
Breaking: Three-day ‘public curfew’ in Amalnera
या व्यतिरिक्त दुध विक्री केंद्रे, वैद्यकीय उपचार, सेवा मेडीकल स्टोअर्स, ॲम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटना यांना सुट देण्यात आली आहे. तसचे २१ मार्च रोजी होणारे पुर्व नियोजित परिक्षा असल्याने परीक्षेच्या कालावधीत परिक्षार्थी व परिक्षेकरीत नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना निर्बंधातून सुट राहणार आहे. दरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी (seema ahire )सीमा अहिरे यांनी काढले आहे.