करंजच्या आगग्रस्तांना पालकमंत्र्यांकडून तातडीची मदत

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील करंज येथे तीन घरांना लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीची मदत केली असून जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी ही मदत संबंधीतांना सुपूर्द केली आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील करंज येथे तीन घरांना शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली असून यात तिन्ही कुटुंबांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने अग्नीशमन दलास संपर्क करून बंब पाठविल्याने ही आग संपुष्टात आली.

दरम्यान, या आगीमुळे संबंधीतांचे नुकसान झाल्याची बाब लक्षात घेता, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रत्येक कुटुंबाला १० हजार रूपयांची मदत दिली. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी सुधाकर पंढरीनाथ पाटील, दीपक सुधाकर पाटील आणि मधुकर पंढरीनाथ पाटील या तिघांना गुलाबरावजी पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. याप्रसंगी बाळाशेठ राठी, प्रमोद सोनवणे, भोकर विकासोचे सचिव ज्ञानेश्‍वरआप्पा, धानोरा खुर्दचे सरपंच देवेंद्र पाटील, जगदीश महाराज, अनिल सपकाळे आदी उपस्थित होते.

Protected Content