पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून पाचोरा तालुक्यातील सातगाव तांडा येथील तरुणाचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की पोपट ओमकार राठोड वय २२ रा. सातगाव तांडा ता. पाचोरा तरुण आपल्या तर परिवारासह वास्तव्याला होता. रविवार १० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा राहुल अभिमान अल्हाड वय-२५ याने गावातील बसस्थानक जवळ शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तसेच हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर मारहाण केली आणि जमिनीवर डोके आपटल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर गावात खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राहुल अभिमान अल्हाड यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे करीत आहे.