भुसावळ येथे खड्डा चुकवताना ट्रक भररस्त्यात उलटली (व्हिडीओ)

bhusaval truck

भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील जळगाव नाका भागात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ आज दुपारी ३.३० च्या सुमारास एक ट्रक खड्डा चुकवताना भररस्त्यात आडवी पडल्याची घटना घडली.

 

या अपघातानंतर त्या भागात वाहतूक खोळंबा झाला असून पोलीस ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही ट्रक सावदा येथून जळगावकडे निघाली असल्याची माहिती कळली आहे. या दुर्घटनेत ट्रक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या फळांच्या गाड्यांवर पडल्याने विक्रेत्यांचे सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

 

Protected Content