भुसावळ -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील महेश नगरातील एका भागात माइंड ॲड बॉडी स्क्रीन केअर स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखाना पोलीस उपविभागीय अधिकारी कुष्णात पिंगळे यांच्या पथकाने रविवारी ३ मार्च रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता छापा टाकला. यात दाम्पत्यासह इतर दोन जणांना अटक करण्यात आली तर पाच पिडीत महिलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील महेश नगराच्या एका भागात माइंड ॲड बॉडी स्क्रीन केअर स्पाच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पथकाने रविवारी ३ मार्च रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील महेश नगरात आलेल्या माइंड ॲण्ड बॉडी स्कीन स्पा या केंद्रावर पोलीसांनी छापा टाकला. यात पोलीसांनी विशाल शांताराम बऱ्हाटे आणि त्यांची पत्नी पल्लवी विशाल बऱ्हाटे हे दाम्पत्य आणि दोन जणांना अटक केली. तर पिडीत पाच महिलांना ताब्यात घेतले आहे. या महिला सोलापूर, पुणे, पहूर जामनेर, कुलाबा मुंबई येथील महिला असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी पोलीसांनी देह व्यापारास लागणारे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत यांनी घेतला सहभाग
सपोनि रूपाली चव्हाण, सपोनि सुदर्शन वाघमारे, महिला सहाय्यक फौजदार शालीनी वलके, स.फौ प्रदीप पाटील, महिला पोकॉ अश्विनी जोगी, अनिल झुंझारराव यांनी कारवाई केली.