ब्रेकींग : जुन्या वादातून हवेत फायरिंग: तरूणाला केली अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात बुधवारी ८ मे रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास एकाने जुन्या वादातून हवेत दोन राऊंड फायर केले होते. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयीत आरोपीच्या नशिराबाद येथून मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्लम भिकन शेख ऊर्फ बाबुराव (वय – २४ रा. गेंदालाल मील, जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गेंदालाल मील परिसरात राहणाऱ्या अली सैय्यद रज्जाक यांचा मुलगा काशिम याच्यासोबत ५ मे रोजी रात्री मौला अली मौला उरूस संदल कार्यक्रम संपल्यावर संशयीत आरोपी अस्लम याच्याशी बॅनरवर नाव टाकण्यावरून वाद झाला होता. बुधवारी ८ मे रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास अस्लम भिकन शेख ऊर्फ बाबुराव हा त्यांच्या घरासमोर आला. जुन्या वादातून त्याने शिवीगाळ करीत दगडफेक सुरू केली.

आवाज आणि गोंधळाने अली सैय्यद रज्जाक परिवारासह बाहेर आले. घराबाहेर उभ्या असलेल्या अस्लम याने शिवीगाळ करीत हवेत गावठी पिस्तूलने २ राऊंड फायर केले. सकाळी ८ वाजता याप्रकरणी अली सैय्यद रज्जाक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव शिरसगर, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, भास्कर ठाकरे, सुधीर सावळे, योगेश पाटील, अमोल ठाकूर आदींनी नशिराबाद उड्डाणपूलखालून संशयित असलम शेख याला सकाळी १० वाजता अटक केली.

Protected Content