श्रीराम रथोत्सवात वृध्दाचा मोबाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरात श्रीराम रथोत्सवात दर्शनासाठी आलेल्या वृध्दाच्या हातातील २८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने हिसकावून लंपास केल्याची घटना गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुमारास घडली. याबाबत शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मकरंद पुरूषोत्तम पाठक (वय-६१) रा. मायादेवी नगर, महाबळ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. टॅक्स असिस्टंट म्हणून ते काम पाहतात. कार्तीक एकादशी निमित्त गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी जळगावात  श्रीराम रथोत्सव काढण्यात आला होता. हा रथ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील दाणबाजार परिसरत आलेला होता. त्यावेळी मकरंद पाठक हे देखील दर्शनासाठी आलेले होते. त्यावेळी त्यांच्या हातातील २८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी झटका देवून लांबविला. ही घटना घडताच पाठक यांनी चोरट्याचा पाठलाग केला परंतू चोरटा गर्दीचा फायदा घेवून पसार झाला. त्यानंतर पाठक यांनी शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content