ब्रेकींग : गूढ आवाजाने हादरले चाळीसगाव !

चाळीसगाव प्रतिनिधी | आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास शहरासह परिसरातील नागरिकांना हादरवून टाकणारा मोठ्या स्फोटासारखा आवाज झाल्याने खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव शहरासह परिसरात आज दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास स्फोेटासारखा मोठा आवाज झाला. थोडा वेळ जमीन हलल्यासारखी झाली. यामुळे अनेक जण घराच्या बाहेर धावत आले. काही क्षणातच परिसरात ही माहिती पसरली. सोशल मीडियातूनही याबाबत चर्चा सुरू झाली.

हा स्फोटासारखा आवाज नेमका कशाचा झाला ? हा भूकंपाचा सौम्य धक्का होता का की अन्य काही ? या संदर्भात अद्यापही अधिकृत माहिती मिळालेली नाही. लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने याबाबत तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अद्यापही अधिकृती माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. तथापि, प्राप्त माहितीनुसार हा फार मोठी गंभीर मुद्दा नसल्याने लोकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता चुकीची माहिती फॉरवर्ड करू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या संदर्भात प्रशासनाने अधिकृत माहिती जाहीर केल्यानंतर ती आपल्याला लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून दिली जाईल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.