आनंदा बाविस्कर यांच्या संकल्प फाउंडेशन व नांद्रा ग्रामपंचायतकडून गौरव

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदा बाविस्कर (पेंटर) हे अत्यंत गरीबांना आरोग्य सेवा देण्यासाठी अनेक वर्षांपासून अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल संकल्प फाऊंडेशन व नांद्रा ग्रामपंचायतीने त्यांचा गौरव केला.

त्याच बरोबर गावात नव्याने  पाणी पुरवठाची जबाबदारी सांभाळून तीन ते चार दिवसात गावात पाणी पुरवठा करणारे कर्मचारी संजय बोरसे यांचा ही सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच आशा तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत सदस्य तथा संकल्प फाऊंडेशन चे किशोर पाटील, सामाजिक कार्यकर्ते विनोद तावडे, ग्रा. प. सदस्य योगेश सुर्यवंशी, बंटी सुर्यवंशी, भाऊसाहेब बाविस्कर, निर्मला पिंपडे, दिलीप सोनवणे, ग्रामविकास अधिकारी अनिता सपकाळे, लिपीक जगदीश बाविस्कर, दिलीप तावडे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!