एमएसडब्ल्यूसी निवडणुकीत खा.पवार यांच्या पॅलनचा दणदणीत विजय

chalisagaon mswc

 

चाळीसगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या (एमएसडब्ल्यूसी) इतिहासात स्थापनेपासून आजतागायत प्रथमच पदाधिकारी निवडीसाठी निवडणुक घेण्यात आली असून निवडणूक नुकतीच पुण्यात पार पडली. या निवडणुकीत माजी मंत्री तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या पॅनलच्या विरोधकांना चारी मुंड्या चित करुन दणदणीत विजय मिळवला आहे. विद्यमान खासदार रामदास तडस व हिंद केसरी योगेश दोडके या दिग्गजांच्या पॅनलचा धुव्वा उडवत विजय प्राप्त केला.

शामसुंदर शुक्ल यांचे आश्रयदाते म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार – अध्यक्षपदी शरदचंद्र पवार, उपाध्यक्षपदी धवलसिंग पाटील, भरत मेकाले, मारोती आडकर, कार्याध्यक्षपदी नामदेवराव मोहिते, सहचिटणीस बाळासाहेब लांडगे व सदस्य सुनिल देशमुख यांचेसह संपूर्ण पॅनलने घवघवीत यश संपादन केले.

वरील सर्व विजयी उमेदवारांसह कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार राजीव देशमुख, शामसुंदर शुक्ल, शिवाजी राजपूत, नारायण अग्रवाल, गोपाळ अग्रवाल, संजय पाटील, संजय महाजन, मालोजीराव भोसले, कैलास आमले, अजय देशमुख, पी.पी.पाटील, मिलींद देशमुख, युवराज भोसले, प्रा. दिपक शुक्ल, मंगलसिंग पवार, आण्णा पहेलवान, नामदेव पहेलवान, अशोक जाधव, प्रशांत निकम, प्रशांत महाजन, भानुदास विसावे, भानुदास आरके, विजय मराठे, विजय शर्मा व जळगाव जिल्हा कुस्तीगीर संस्थेच्या वतीने विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.

Protected Content