पारोळा येथील वाचनालयासाठी श्रीराम पवारांकडून ५१०० रुपयांची मदत

shriram pawar

 

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विविध क्षेत्रातील मान्यरांच्या गुणगौरव सोहळ्यात औरंगाबाद येथील संत कबीर विद्यालयातील शिक्षक श्रीराम पवार यांनी आपल्या गावाप्रती असलेल्या प्रेम व भावी पिढीतील तरुणांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल, अशा स्पर्धा परीक्षा वाचनालयासाठी ५१०० रुपयांची मदत दरवर्षी देण्याचे जाहीर केले आहे.

तालुक्यातील छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पृथ्वीराज पाटील येणाऱ्या भावी पिढीतील तरुणांना मार्गदर्शक ठरेल अशा स्पर्धा परीक्षा वाचनालयाची सुरुवात छत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून करायचा माणस बोलून छत्रपती प्रतिष्ठानला कुठल्याही प्रकारचा सरकारी निधी मिळत नसल्याकारणाने वाचणालयाची उभारणी हि देणगीदाराच्या सहकार्याने करता येईल, म्हणून कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांना मदतीचे आवाहन त्यांनी केले.

टोळी गावातीलच सुपूत्र व हल्ली औरंगाबाद येथील संत कबीर विद्यालयातील शिक्षक श्रीराम पवार यांनी आपल्या गावाप्रती असलेल्या प्रेमापोटी व येणाऱ्या भावी पिढीतील तरुणांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल अशा स्पर्धा परीक्षा वाचनालयासाठी आपल्या जन्म तारखेनुसार म्हणजे 14 × 365 बरोबर ५१०० रुपये दरवर्षी देण्याचे जाहीर केले असून छत्रपती प्रतिष्ठानचे नियमित सदस्य म्हणून टोळी गावातील जनतेसाठी सामाजिक कार्यात योगदान देण्याच्या प्रयत्न करेल. भावी पिढीतील तरुणांच्या भविष्याचा विचार करुन जो निर्णय पवार यांनी जाहीर केला, त्याबद्दल पंचकृषीतील सर्व नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

यावेळी छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष संदिप पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती प्रतिष्ठानच्या महत्वाकांक्षी उपक्रमात सहभागी होऊन, सहकार्य केल्याबद्दल प्रतिष्ठानचे सचिव रविंद्र पाटील यांनी त्यांचे आभार मानले.

Protected Content