नाशिक प्रतिनिधी । राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनास पाठींबा दिला असून यापुढे मराठा व ओबीसी या दोन्ही समाजांनी एकत्र लढावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरनंतर आज, सोमवारी नाशिकमध्ये मूक आंदोलन होत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या आंदोलनात मंत्री छगन भुजबळ सहभागी झाले. यावेळी बोलताना भुजवळ यांनी कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज अडचणीत आहेत. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं. तर ओबीसींच्या असलेल्या आरक्षणावर कोर्टाने गदा आणली. त्यासाठी आता दोन्ही समाजानं एकत्र लढायला हवं, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली.
ओबीसी आणि मराठा समाजात वितुष्ट निर्माण करणे योग्य नाही. मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरक्षण प्रश्नी चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही. मी तुमच्याबरोबर आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असे त्यांनी नमूद केले.