कर्ज घेणे स्वस्त होणार ! आरबीआयने कमी केले रेपो रेट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २०२६ साठीच्या पहिल्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जात होती.

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, एमपीसीने रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला असून, यानुसार रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरून आता ६ टक्के झाला आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जांचे हप्ते कमी होतील. परिणामी, नागरिकांच्या हातात खर्च करण्यासाठी अधिक पैसा राहील. यामुळे बाजारात रोख प्रवाह वाढून उपभोग व गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे.

मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं की अन्नधान्याच्या किमतींमध्ये अपेक्षेपेक्षा मोठी घट झाल्यामुळे सध्या महागाई नियंत्रणात आली आहे. मात्र, हवामानातील बदल आणि जागतिक अनिश्चिततेमुळे होणाऱ्या संभाव्य जोखमींकडे लक्ष ठेवले जात आहे. गव्हर्नर मल्होत्रा यांच्या मते, धोरण व व्यापार अनिश्चिततेमुळे वाढीचा अंदाज ०.२० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.
तिमाहीनुसार वाढीचे अंदाज पुढीलप्रमाणे आहेत: गेल्या पाच वर्षांनंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये RBI ने प्रथमच रेपो दरात कपात केली होती, जेव्हा तो ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आणण्यात आला होता. आणि आता, सलग दुसऱ्यांदा दर कपात करत रेपो रेट ६ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

Protected Content