मुंबई हायकोर्टाने पतंजलीला ठोठावला ४ कोटीचा दंड

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडला मोठा दणका दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेल्या ट्रेडमार्क उल्लंघन केल्या प्रकरणी पतंजलीच्या कापूर उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. २०२३ मध्ये दिलेल्या या आदेशाचे उल्लंघन केल्याने उच्च न्यायालयाने ही कारवाई केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कोर्टाच्या २०२३ च्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन केले. या बाबत न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या एकल खंडपीठाने पतंजलीने जाणूनबुजून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने दंड ठोठावला. तसेच ही रक्कम दोन आठवड्यात जमा करण्याचे आदेश देखील दील आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने कंपनीला ५० लाख रुपये जमा करण्याचेही आदेश दिले आहेत.

न्यायमूर्तींनी मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेली याचिका खंडपीठाने निकाली काढली. यामध्ये न्यायालयाच्या बंदीनंतरही कापूर उत्पादने विकल्याबद्दल पतंजलीवर अवमानाची कारवाई करण्याची विनंती केली होती. मंगलम ऑरगॅनिक्सने नंतर अर्ज दाखल करत पतंजली अंतरिम आदेशाचे उल्लंघन करून कापूर उत्पादने विकत असल्याचा आरोप केला होता. यावर निकाल देत न्यायलयाने हा दंड ठोठावला आहे.

Protected Content