बोदवड bodvad प्रतिनिधी । शहरात नागरी समस्यांचे निराकरण होत नसल्याने शिवसेनेतर्फे आजपासून नगरपंचायतीच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
बोदवड नगरपंचायतीच्या विरोधात जनतेच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने आणि शिवसेनेच्या वतीने shivsena वारंवार समस्यांचे निवेदन देऊन सुद्धा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे शिवसेना पक्षा तर्फे आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
या उपोषणात तालुका प्रमुख गजानन खोडके, शहर प्रमुख हर्षल बडगुजर व संजय महाजन यांच्यासह नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक दीपक झांबड, इरफान शेख,कैलास माळी नगरसेवक,संजय महाजन,आसिफ बागवान,आतिष सारवण,अप्पू भांजा, पंकज,निलेश माळी वाघ,सुनील वैदे,मनोज पाटील,समशेर भाऊ,लक्ष्मण साठे,धनराज माळी,आमीन पिंजारी,भिकान पिंजारी, विलास पाटील,अफजल मिस्त्री,सचिन भोई,शंकर सोनार,शफीक पटवे,अनिल कल्याणकर,सुधाकर माळी, संदीप भोई,योगेश भोई,प्रल्हाद भोई,गजाजन भोई,मुनाफ मेकॅनिक,बंटी सपकाळ, मनीषा कोळी,कल्पना गुरचळ,सुमित्रा माळी,पूजा माळी, प्रमिला कांडेलकर,रेखा निकम,सुनंदा सुर्यवंशी,सुमिता गायकर,सईदा बी आदी सहभागी झाले आहेत.